बाभुळगाव-: इसम नामे सुरेश रंगनाथ शिंदे वय 68 रा बाभुळगाव ता बार्शी जि सोलापूर हे दि. 17/02/2025 रोजी दुपारी 04/00 बार्शी येथून बाभूळगाव येते जातो म्हणून आगळगाव पर्यंत गेले परंतू ते बाभूळगाव येथे घरी गेले नाहीत. त्याबाबत त्यांचा मुलगा गोवींदा सुरेश शिंदे यांनी त्यांचे नातेवाईक, मित्र यांचेकडे चौकशी केली परंतू काही माहीती मिळून आली नाही. त्यानंतर दिनांक 20/02/2025 रोजी दुपारी 03/30 वा. चे सुमारास शेतकरी नितीन रमेश शिंदे यांचे शेती गट नंबर 165 मध्ये ऊस लागवड चालु असताना ऊसाचे सरीमध्ये एक मानवी पाय उघडा व बाकीचे शरीर मातीत अर्धवट पूरलेले दिसून आलेने त्याबाबत माहीती पोलीस स्टेशनला मिळाल्याने पोलीस व महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून दोन पंचासमक्ष सदरचे प्रेत उकरले असता सदरचे प्रेत हे सुरेश रंगनाथ शिंदे वय 68 रा बाभुळगाव ता बार्शी जि सोलापुर यांचे असल्याचे त्यांच्या मुलांनी ओळखून सांगितले. प्रेताचे दोन्ही हात शर्टाने बांधलेले व गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसून आल्या. यावरून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून सुरेश रंगनाथ शिंदे यांचे दोन्ही हात बांधुन, गळा आवळून खुन करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुरले आहे म्हणून बार्शी तालुका पोलीस ठाणेस गु.र.नं. 55/25 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपासामध्ये आरोपीचे शोधकामी वेगवेगळे पथके तयार करून बाभूळगाव व आगळगाव परीसरातील लोकांकडे कसूशीने विचारपूस, तपास केला असता गोपनीय माहीती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा हा मयताचे शेजारी वावरणारे दिलीप निवृत्ती झोंबाडे व बाभुळगाव येथे सालगडी म्हणून काम करणारा इसम राहूल नागेश गायकवाड रा. कडलास ता. सांगोला यांनी केले बाबत माहीती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने सदर इसमांकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर इसमांनी सुरेश रंगनाथ शिंदे यांचे गळ्यातील सोन्याची चेन व जवळ असलेल्या पैशांसाठी कट रचून, गळा आवळून, खून करून प्रेत नितीन शिंदे यांचे शेतात पूरल्याची कबूली दिली. तसेच त्याबाबत तांत्रीक तपास केला असता सदरचा गुन्हा हा वरील आरोपी यांनी केला असल्याचे निष्पन्न झालेने सदर आरोपी यांना अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायालय, बार्शी यांचेसमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी यांना 6 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली असून सदरकामी सहा. सरकारी अभियोक्ता श्री. सोनवणे यांनी सरकारतर्फे बाजू मांडली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु असून गुन्ह्यात आणखीन आरोपीचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री अतूल कुलकणी, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर, मा. उपविभागीय अधिकारी श्री जालिंदर नालकूल यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, पोहेकों अभय उंदरे, पोहेकों धनराज केकाण, पोना सागर शेंडगे, पोकों राहूल बोंदर, पोकों सिध्देश्वर लॉडे, पोकों युवराज गायकवाड तसेच बाशी शहर पोलीस ठाणेकडील पो. उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, एएसआय अजित वरपे, पोकों धनराज फत्तेपूरे व पोकों रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
0 Comments