कोंढवे धावडे - अनेक जण आपला वाढदिवस हा साजरा करत असतात पण काहीजण वाढदिवस हा प्रेरणादायी बनवत असतात असाच प्रेरणादायी वाढदिवस रेखा सावंत यांनी श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुला मुलींची शाळा कोंढवे धावडे येथे विकलांग मुला मुलींना अन्नदान करत त्यांना साहित्य रुपी मदत करत साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत संस्थापक अध्यक्ष संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला...
या वाढदिवसा दिनानिमित्त विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते अनिलजी पाटील यांचे लाभले...
या कार्यक्रमाला विशेष अतिथी सामाजिक कार्यकर्ते अनिलजी पाटील निलेशजी पवार तात्याराव शिंदे श्रीरंग गायकवाड अवनीताई सागवेकर सुमन सावंत संचू सावंत नयन सावंत नीलम यादव अश्विनी सेलविराज प्रशांत महाजन व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...
आपण आपले वाढदिवस साजरे करत असताना ते कोठे साजरे केले गेले पाहिजे कसे साजरे केले गेले पाहिजे याचं सर्वांना भान असणं गरजेचं आहे कारण ज्यांचा खराच आशीर्वाद आपल्याला मिळावा असे आपल्याला वाटत असेल तर ते आहेत आपल्या आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि खऱ्या अर्थाने आपण आपला वाढदिवस साजरा करत असताना कर्मरूपी आशीर्वाद मिळावा असेच वाटत असेल तर आपला वाढदिवस हा अतिशय साध्या पद्धतीने कर्मरूपी आशीर्वाद ज्या ठिकाणी मिळतील अर्थात दिव्यांग अपंग गरीब सामान्य यांचा यावेळेस जाणीवपूर्वक विचार करून वाढदिवस साजरा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने अभिष्टचिंतन सोहळ्याला दाद देण्यासारख आहे त्यासाठी भुकेलेल्या अन्न तहानलेल्या पाणी एवढे जरी आपल्याला देणं जमलं तरी खूप झालं असं मत यावेळी साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत यांनी व्यक्त केले...
बऱ्याच ठिकाणी अन्नदान हे केलं जातं परंतु दिव्यांग मुलांना जी गोष्ट आवडते ती गोष्ट आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी आवर्जून त्यांना मिळावी हा मानस मी पूर्ण करू शकले आणि त्यांचा कर्मरूपी आशीर्वाद मिळवण्यास पात्र ठरले त्याबद्दल मी स्वतः सर्व दिव्यांग मुला मुलींचे मनस्वी आभार मानते असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेखा सावंत यांनी व्यक्त केले...
जाणीवपूर्वक दिव्यांगांची दखल घेतली त्याबद्दल श्रावस्ती फाउंडेशनच्या संस्थापिका सौ कांचनाताई कदम यांनी उपस्थित यांचे आभार मानले...
0 Comments