शनि शिंगणापूर-: दि. 11/05/2025 रोजी 21.45 वा सुमारास शनि शिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिंगणापूर गावातील हॉटेल यश गार्डन परमिट रूम येथे फिर्यादी हे हॉटेलचे काउंटरवर असताना यातील आरोपी मजकूर यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे अंगावर अचानक चालून आले व त्यातील एका जणांनी काहीतरी वस्तूने फिर्यादीच्या डोक्यात मारले साथीदार आरोपीतांनी फिर्यादी यांना मारहाण केली तसेच फिर्यादीचे वरील हॉटेलमध्ये जमा झालेल्या साधारण 22,000/- ते 23000/- घेऊन गेले आहेत वगैरे मजकुराची फिर्यादीवरून शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गुरनं. 116/2025 भा.न्या.स. कलम 191(2),189(2),118(2),119(1),115(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यातील पाहिजे असलेले आरोपी नामे 1) यश ऊर्फ भिंगऱ्या जालिंदर भिंगारदिवे, वय-21 वर्ष, राहणार - बेलेकर वाडी रोड, सोनई, तालुका नेवासा , जिल्हा अहिल्यानगर 2) सनी ऊर्फ मध्या किसन शिंदे, वय-21 वर्ष, राहणार -हलवाई गल्ली, आंबेडकर चौक, सोनई, तालुका - नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांना गुन्ह्या घडल्या पासून 24 तासाचे आत ताब्यात घेवून अटक करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर कारवाई वेळी शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. आशिष शेळके सो, सहाय्यक फौजदार नितीन सप्तर्षी, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे, पोहेकाँ रमेश लबडे, चा.पो.काँ. संतोष मुरकुटे, मारुती पवार,पोकाँ अमोल पोंधे, पोकाँ अजय ठुबे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वृषाली गर्जे यांनी *स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोहेकॉ ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकॉ गणेश भिंगारदिवे, पोना अशोक लिपने, पो कॉ भगवान थोरात, पो कॉ रोहित येमुल, पो का. किशोर शिरसाठ* यांच्या मदतीने सदरची कारवाई केली आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. राकेश ओला सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलुबर्मे सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा. श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, मा. दिनेश आहेर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष शेळके, सहाय्यक फौजदार सप्तर्षी यांनी केली असून अटकेतील आरोपीतांना मा. न्यायालयाने दि. 17/05/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड सुनावली असून पाहिजे असलेले इतर आरोपीत यांचा कसून शोध घेणे सुरु आहे.
0 Comments