• भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे-: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीत्त उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्याना आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नबर २२. सय्यदनगर, हडपसर, पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतुन रिक्षा व दुचाकी गाड्या चोरी करुन त्या कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे लावुन ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोड, पेरुची बाग येथे जावुन पाहता तेथे आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा मिळून आला असून त्याचेकडुन २ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त केली असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मदे दोन गुन्हा नोंद आहे,येरवडा पोलीस स्टेशन मदें एक गुन्हा नोंद आहे
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील,सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, सदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments