Hot Posts

6/recent/ticker-posts

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम वर दरोडा टाकणाऱ्या परराज्यातील टोळीला देहूरोड पोलीसांनी रंगेहाथ पकडून केले जेरबंद.

 

      पिंपरी चिंचवड-: मागील दोन महिन्यांपुर्वी विठ्ठलवाडी देहूगाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून १६,८७,४००/- रोख रक्कम चोरीचा गुन्हा घडलेला होता. सदर एटीएम चोरी प्रकाराचे अनुषंगाने मा. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि-२ यांचे सुचनांप्रमाणे देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुन्हा एटीएम चोरीचा प्रकार घडणार नाही याकरीता परिणामकारक रात्रगस्त पेट्रोलींग करणेबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्या सुचनांप्रमाणे देहूगाव बिट मार्शल कर्तव्यावरील पोलीस अंमलदार हे देहू आळंदी रोड या परिसरामध्ये रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतात.

     दिनांक २६/०५/२०२५ रोजी रात्री ०१.५० वा. चे सुमारास देहूगाव मुख्य कमानीच्या पुढे देहू आळंदी रोडवर थ्री एटीएम नावाने परिचीत असलेले इंडसइंड बँकेचे एटीएमचे काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याची पोलीस अंमलदार यांना दिसली व त्यात काही इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याचे दिसले. बिट मार्शलवरील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई ३४८५ समाधान पटावकर, पोलीस शिपाई २५८९ किरण पाटील यांनी सदर गाडीकडे जावून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदरची कार ही तेथून भरधाव वेगाने आळंदीचे दिशेने निघून गेली. त्यावेळी सदरच्या कारमध्ये पुढील बाजूस दोन पुरूष इसम व मागील बाजूस एक महिला बसलेली दिसली. बिट मार्शलवरील पोलीसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतली असता इंडसइंड बँकेचे एटीएमचे शटर थोडे उचकटलेले व त्यातून उजेड बाहेर दिसला तसेच आतील बाजूस काहीतरी सामान जमीनीवर पडल्यासारखा आवाज आल्याने, त्यांना एटीएम चोरीचा संशय आल्याने, बिट मार्शलवरील पोलीस अंमलदार यांनी रात्रगस्त पोलीस अधिकारी सहा पोलीस निरीक्षक जोएब शेख यांना फोनद्वारे माहिती देवून मदतीकरीता बोलाविले आणि एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी एटीएम मध्ये दोन सडपातळ बांध्याचे पुरुष गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमची तोडफोड करून दरोडा टाकताना दिसले. पोलीसांना पाहून त्या दोन इसमांनी जोरजोरात ओरडून शिवीगाळ व पोलीसांचे दिशेने दगडफेक करून, त्यांचेशी झटापट करू लागले. थोडयाच वेळात रात्रगस्त पोलीस अधिकारी सहा पोलीस निरीक्षक जोएब शेख व पोलीस शिपाई सोपान वालेकर हे घटनास्थळी आले.

     त्यावेळी पोलीसांनी बळाचा वापर करून दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे १) मुस्तफा मोबीन खान, वय-३० वर्ष, २) मुस्तकीम मोबीन खान, वय-२५ वर्ष दोघेही राहणार - पिनागव्वान तालुका पुन्हाना, जिल्हा-नुह राज्य- हरियाणा तसेच त्यांचे सोबत आलेले व कारमधून पळून गेलेले त्यांचे साथीदार नामे ३) सिमा युसूफ खान, वय अंदाजे ४० वर्ष, ४) वारीस खान, वय अंदाजे २० वर्ष, ५) युसूफचा भाऊ आझाद खान वय अंदाजे ४५ वर्ष हे सोबत होते व त्यांच्या टोळीचा म्होरक्या हा युसुफ खान असून, सदरची टोळी ही हरियाणा राज्यातील असल्याचे समजले.

      त्यानंतर सदरहू घटनेबाबत बिट मार्शलवरील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई ३४८५ समाधान विष्णू पटावकर, नेमणुक देहूरोड पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींविरुध्द देहूरोड पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर १५७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२), ३१२, १३२ अन्वये दि.२७/०५/२०२५ रोजी गुन्हा नोंद करून ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.

        सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ.शशिकांत महावरकर साो. पोलीस सह आयुक्त. पिं.चिं. मा. सारंग आवाड साो. अपर पोलीस आयुक्त, पिं.चिं.यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा. विशाल गायकवाड साो. पोलीस उपायुक्त, परि. २,पिं.चिं. मा. सुनिल कुराडे, सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहुरोड पो.स्टे. सहा. पोलीस निरीक्षक जोएब शेख, पोलीस शिपाई समाधान पटावर, पोलीस शिपाई किरण पाटील, पोलीस शिपाई सोपान वालेकर यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हा जोएब शेख, सहा. पोलीस निरीक्षक देहूरोड पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments