जालना -: जिल्हयात मोटार सायकल चोरी करणा-या ईसमाची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यानुषंगाने दिनांक 02/04/2025 रोजी 14.30 वा. डावरगाव ते झिरपी फाटयादरम्यान अनोळखी इसमाने फिर्यादी नामे विश्वनाथ एकनाथ मिरकड, वय-33 वर्ष, व्यवसाय-शेती, रा. कोळवाडी, ता.जि. जालना यांची होंडा शाईन मोटार सायकल चोरी केली असल्याने सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीताचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे विकास ऊर्फ मिड्ड संजय बहिरे, वय-29 वर्ष, रा. कन्हेरवाडी, ता. परळी, जि.बीड याने सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे विकास ऊर्फ मिष्ठ संजय बहिरे, वय-29 वर्ष, रा. कन्हेरवाडी, ता.परळी, जि.बीड यास बीड येथुन ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेली होंडा शाईन कंपनीची एक मोटार सायकल काढुन दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड श्री. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुधीर वाघमारे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, देविदास भोजने, ईरशाद पटेल, सतिष श्रीवास, आक्रूर धांडगे, भागवत खरात, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.
0 Comments