• पती, चुलत जावई व पुतणी यांचे ताब्यातुन सुमारे २१ किलो गांजासह सुमारे ११ लाख रुपये किंमतीचा माल जप्त,”
पिंपरी चिंचवड -: मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, स्वप्ना गोरे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. दि २४/०५/२०२५ रोजी वपोनि संतोष पाटील, सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे बावधन येथील पाषाण सुस रोडवर पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पाषाण सुस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिचे कल्याणी कलेक्शन नावाचे दुकानामध्ये व राहते घरामध्ये तीचे साथिदारांसह गांजाची विक्री करीत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकुन इसम नामे १. उमेश सुर्यकांत देशपांडे, वय ५६ वर्षे, रा शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट क्र ७, पाषाण सुस रोड, पुणे, २. अभिषेक विकास रानवडे, वय ३२ वर्षे, सध्या रा बालाजी निवास, हनुमान मंदिराचे बाजुला, पाषाण सुस रोड, पुणे मुळ रा ६२० / २१ अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराचे जवळ, दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे, ३. महिला ना ऐश्वर्या अभिषेक रानवडे / ऐश्वर्या निलेश देशपांडे, वय २२ वर्षे, रा सदर यांचे ताब्यातुन एकुण ११,२७,७००/- रुपये किंमतीचा २० किलो ७३६ ग्रम गांजा हा अंमली पदार्थ, ०३ मोबाईल व ७०० /- रुपये रोख रक्कम असा माल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द बावधन पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ.क्र १ ते ३ यांना विक्रीकरीता गांजा हा अंमली पदार्थ कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिने आणुन दिला असल्याचे समोर आले असुन ती अद्याप फरार आहे.
अभिषेक विकास रानवडे याचेवर यापुर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) फरसखाना पोलीस स्टेशन गु.र.क्र. २४५/२०१७ भारतीय दंड विधान ३०७ व इतर
२) विश्रामबाग पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५३ /२०२१ भारतीय दंड विधान कलम ३६३, ३६६, ३७६ (२) व इतर
३) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पाहिजे आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिचेवर यापुर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३०२६ / २०१३ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७
२) कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. २६८/२०१६ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७
३) कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३४७/२०१६ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७ व मोका
४) चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३९३/२००७ भारतीय दंड विधान ३४४, ३६६, ४३८
५) चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३३०० / २००८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२
६) हवेली पोलीस स्टेशन ०१/२००५ भारतीय दंड विधान ३०२
७) चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १०१/२०१३ भारतीय दंड विधान ४२०, ४३८ व पिटा अॅक्ट
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, गणेश कर्पे, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव यांचे पथकाने केली आहे.
0 Comments