Hot Posts

6/recent/ticker-posts

मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेले तरुणावर गोळीबार. पुण्यात दिवसा ढवळ्या घडताहेत गुन्हे. परिसरात घबराट.

 

    •.  आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने पिस्तूल का बाळगवले? तसेच कोणाकडून आणले? या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

        पुणे : किरकोळ वादातून सराईतांकडून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी सराईतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. रोहित माने (३०, लोहियानगर) आणि कासीम असीफ अन्सारी (२३ रा. लोहियानगर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

     याबाबत किरण केदारी (३७, रा. गोखलेनगर) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास केदारी हा मित्र शाम गायकवाड, अश्फाक शेख आणि संतोष कांबळे यांच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी माने आणि अन्सारी तेथून दुचाकीवरून चकरा मारत होते. केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अन्सारी याने कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले केदारी यांच्यावर गोळी झाडले. त्यानंतर अन्सारीने दहशत माजवण्यासाठी पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार च्या घटनेनंतर केदारे आणि त्याचे मित्र घाबरले आरोपींनी तोपर्यंत तिथून पळ काढला. काही वेळानंतर रोहित माने याने पुन्हा आला आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे असे सांगितले. चौघांनी माने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती फारच काना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेले अन्सारीला पकडले. दोघेही आरोपी सराईत असून त्यांनी पिस्तूल का बाळगले असेच कोणाकडून आणले या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments