पिंपरी चिंचवड -: छावा प्रतिष्ठान, नवी मुंबई या संस्थे मार्फत संस्थापक अध्यक्ष अमित गंडाकुश यांनी मराठी साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी 21 मे रोजी झालेल्या महाराष्ट्रभरात नावाजलेला "छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2024 - 2025" या पुरस्काराचे आयोजन भव्य दिव्य अशा स्वरूपात करण्यात आलेले होते या पुरस्कारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिडा क्षेत्रासाठी सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव व पुणे शहर येथील श्री.अजय कांबळे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य म्हणून श्री.काळूराम लांडगे, डॉ. व नगरसेवक विश्वास गजरमल, राहूल साळुंके व शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुभाष माकर यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेते संभाजी माने व प्रसिद्ध सिने अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनोज घोरपडे (आमदार उत्तर कराड), वैभव नाईक युवा नेते, सरनोबत अमित दादा गाडे पाटील (छत्रपती संभाजी महाराज यांचे दूधभाऊ यांचे वंशज), सुभेदार कुणाल दादा मालुसरे (नरविर सुभेदार तानाजी बाबा मालुसरे यांचे वंशज), सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील (सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज), सचिन दादा भोसले, विजय राऊत (ए पी आय रायगड पोलीस) इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन वस्ताद डॉ अमित गंडाकुंश (छावा प्रतिष्ठान) यांनी अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात केले होते
0 Comments