Hot Posts

6/recent/ticker-posts

अहिल्‍यामाई म्‍हणजे न्यायप्रिय, प्रजावत्सल व दूरदृष्टीच्‍या शासक : सतिश काळे

 

• संभाजी बिग्रेडच्‍या वतीने अहिल्‍यामाई होळकर यांना अभिवादन.....

       पिंपरी चिंचवड-: अहिल्यामाई होळकर या न्यायप्रिय, प्रजावत्सल व दूरदृष्टीच्‍या शासिका होत्या. त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी न्याय आणि विकासाचे कार्य केले. अहिल्यामाईंना सामाजिक न्याय, धर्मनिष्ठा आणि प्रशासन कौशल्य यासाठी ओळखले जाते. त्यांचे जीवन आणि कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निस्वार्थ,न्यायी आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वामुळे त्यांना 'लोकमाता' ही पदवी मिळाली असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी केले. 

       अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्‍त संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी मोरवाडी पिंपरी चौकातील अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्यास शहर उपाध्यक्ष निरंजनसिंह सोखी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी काळे बोलत होते. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण सचिव मंगेश चव्हाण संघटक उमेश जाधव,योगेश पाटील,आतिक आत्तार,गणेश देवराम,निलेश बामणे आदीसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काळे म्‍हणाले की अहिल्यामाई धार्मिक सहिष्णुता व सौहार्द यांचा आदर्श ठेवणाऱ्या शासिका होत्या त्यांच्या कार्यातून त्यांची धर्मभावना सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाची भावना दिसून येते. लोकोपयोगी कार्यात आयुष्य खर्चिले, जनसेवा केली. अनिष्ट रूढी परंपरांना प्रखर विरोध दर्शवला अशा कुशल प्रशासक, कार्यक्षम शासनकर्त्या, कर्तृत्ववान लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतींना वंदन करायला हवे असे काळे म्‍हणाले.



Post a Comment

0 Comments