Hot Posts

6/recent/ticker-posts

माता रमाई स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन.

 


        पिंपरी चिंचवड दिनांक.१८/०९/२०२४-: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माता रमाई स्मारक चे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे म्हणून अनेकवेळा आंदोलन करुन देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका चालढकल करीत काम पूर्णत्वास नेत नाही वेळोवेळी पाठपुरावा करूनही याचा प्रशासनाला काहीही फरक नसल्याचे दिसून येतं आहे यास्तव आदरणिय धुराजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  माता रमाई स्मारक समिती गेल्या 2 सप्टेंबर पासुन बेमुदत धरणे आंदोलनाला बसले असुन आज आपण सर्वांनी मिळुन यांना जाहीररीत्या पाठिंबा दिला असून येत्या 15 दिवसांत जर आम्हास यावर प्रशासनाने ठोस असे काम न केल्यास आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असाही इशारा यावेळी पिंपरी चिंचवड प्रशासनाला देण्यात आला.


        यावेळी भिमशक्ती मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मिलिंदजी रणदिवे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू अण्णा दहीतुले, भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष हरीश भाऊ डोळस,काँग्रेस परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वातीताई शिंदे, भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रतिभाताई बनसोडे, भिमशक्ती महिला संघटक वैशाली आठवले,काँग्रेस उद्योग विभागाच्या  पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रतिभाताई कांबळे, भीमशक्ती पिंपरी चिंचवड युवक सरचिटणीस कपिल डोळस, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष विजयजी ओव्हाळ, गौरीताई शेलार, प्रमोदजी शेलार, भीमशक्तीचे भोसरी विधानसभा सचिव सुनीलजी कांबळे, काँग्रेस व्यापारी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अमरजीत सिंग पोथीवाल, भीमशक्ती युवक आघाडी  पिंपरी चिंचवड शहर महासचिव विकीभाऊ पासोटे, मोहसीन भाई शहा  आदी मान्यवर पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments