मानवत // प्रतिनिधी.राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या व्यापारी यांच्या व साई भक्तांच्या सोयीसाठी पाथरी आगारातून नवीन लांब पल्यांच्या एसटी सेवा सुरू करण्यासाठी पाथरी आगार प्रमूख यांना प्रवाशी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
पाथरी आगारात जसजशा नवीन एस.टी. बसेस येतील त्याप्रमाणे लांब पल्याच्या एसटी सेवा सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आगार प्रमुख चपटे यांनी दिली.
पाथरी आगारातून लांब पल्याच्यां रापमंची बस सेवा सुरू करण्यासाठी आज प्रवाशी संघटनेच्या वतीने पाथरी आगार प्रमूख( व्यवस्थापक ) हनुमंतराव चपटे यांना निवेदन देण्यात आले. आगार प्रमुख चपटे यांना भारतीय जनता पार्टी व रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ जिल्हा कार्यकारणी, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मानवत शहर हे परभणी जिल्ह्यातील नावाजलेले शहर असून नामांकीत अशी समजली जाणारी बाजारपेठ व कापूस खरेदीसाठी मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर असून पाथरी येथे संत शिर्डीचे साईबाबा यांची जन्मभूमी आहे.
मराठवाड्यात तसेच विदर्भ व खानदेश मध्ये साईभक्त मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रवासी व्यापारी व साई भक्तांसाठी पाथरी आगारातून रापमंची बस सेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदनात देण्यात आले आहे.
1 ) मानवत ते कोल्हापूर मार्गे पाथरी, माजलगाव, पंढरपूर,मार्गे कोल्हापूर
2 ) मानवत ते नाशिक मार्गे पाथरी, माजलगाव, अहिल्यानगर, संगमनेर,मार्गे नाशिक ३) पाथरी ते अमरावती मार्गे परभणी, हिंगोली, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, मार्गे अमरावती ४) पाथरी ते शेगाव मार्गे परभणी, हिंगोली,वाशिम, पातुर ,मार्गे शेगाव ५) मानवत ते धुळे मार्गे पाथरी, सेलू ,छत्रपती संभाजीनगर, कन्नड चाळीसगाव, मार्गे धुळे ६) मानवत ते जळगाव मार्गे पाथरी, सेलू, जालना,मार्गे जळगाव ७) मानवत ते लातूर मार्गे पाथरी, सोनपेठ परळी अंबाजोगाई मार्गे लातूर , ८) पाथरी येथून सकाळी 6.30 वाजता सुटणारी पाथरी ते सोनपेठ ही एसटी सेवा मानवत ते सोनपेठ सकाळी 6.15 अशी करण्यात यावी
या नवीन एसटी सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच मानवत, पाथरी, परभणी, शहरात सोमवंशीय क्षत्रिय समाजाचेअनेक नातलग हे संगमनेरला असल्याने संगमनेरला जाण्यासाठी मानवत ते नाशिक ही एसटी सेवा सुरू झाल्यास या समाजाच्या लोकांना मानवत ते नाशिक या एसटीचा लाभ होईल असे भाजप रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ जिल्हा कार्यकारिणीचे सहसंयोजक तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे परभणी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष के.डी.वर्मा यांनी सांगितले असता.
यावर पाथरी आगार प्रमुख हनुमंतराव चपटे यांनी पाथरी आगारात सध्या काही नवीन बसेस आलेल्या आहेत. परभणी विभागाचे विभागीय नियंत्रक यांच्या आदेशानुसार आम्ही पाथरी ते कोल्हापूर ,पाथरी ते शिर्डी, पाथरी बीड हिंगोली, अशी एसटी सेवा सुरू करत आहोत. पाथरी ते कोल्हापूर ऐवजी मानवत ते कोल्हापूर तसेच पाथरी ते शिर्डी ऐवजी मानवत ते शिर्डी अशी एसटी सेवा सुरू करण्यासाठी सांगितले असताना. आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार एसटी सेवा सुरू करत आहोत.काही दिवसा नंतर आम्ही मानवत येथून ह्या एसटी सेवा सुरू करूत असे आगार प्रमुख हनुमंतराव चपटे यांनी सांगितले.
यावेळी पाथरी आगाराचे वाहतूक अधिकारी गजानन यडले, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पाथरी तालुका सचिव अनिल शिंदे यांच्या सह या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments